स्मृतीबनातून – प्रीतरीती (काव्य)
आषाढ सरीं उन्मळून बरसत होत्या. योगायोगाने त्याचवेळी बेगम अख्तर यांनी गायलेली शकील बदायुनी यांची सुप्रसिद्ध गझल 'ए मोहोब्बत तेरे अंजाम पे रोना आया’ ऐकताना मनात उमटलेले मराठी रूप.
प्रीतरीती
प्रीती तुझ्या रीतीने आज डोळे भरून आले
न जाणे तव भासानी का डोळे भरून आले?
वाट पाहता तुझी रोज ती सांज ढळते
आज सांजवेळी कसे डोळे भरून आले?
कधी दैवाचा दगा कधी जग त्रागा करे
प्रेमात पावला गणिक डोळे भरून आले
जेव्हा कधीही जगी या होते स्मरण प्रितीचे
मात प्रेमातली स्मरून डोळे भरून आले
नितीन सप्रे
150720262315

👌👍👍
उत्तर द्याहटवासुरेख काव्य रचना आहे.
उत्तर द्याहटवा