पोस्ट्स

मार्च, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृतीबनातून प्रतीक्षा/एकरूप(पद्य)

इमेज
  गुरुदेव टागोर यांच्या गीतांजली या काव्य संग्रहातील हे 17 वे पुष्प...या गीतात ते ईश्वरा बरोबर तादात्म्य साधता यावं यासाठी संपूर्ण समर्पण करण्याची त्याच्याशी एकरूप होण्याची आस बाळगून आहेत Premer haate dhora debo Taai royechhi boshe Onek deri hoye gelo Doshi onek doshe BidhiBidhan-Bandhon dore Dhorte ashe,jaai se sore. Taar laagi ja shasti nebar Nebo moner toshe. Premer haate dhora debo Tai royechhi boshe. Loke aamay ninda kore Ninda se noy michhe Sokol ninda mathaye dhore Robo sobar niche Sesh hoye gelo je bela Bhanglo becha-kenar mela Daakte jara eshechhilo Phirlo tara roshe Premer haate dhora debo Taai royechhi boshe प्रतीक्षा प्रेमल हाती व्हावे अर्पण प्रतिक्षेत त्याच्या आहे थांबून काळ बराच गेला निघून दोष, क्षति घडल्या हातून विधि विधान रज्जूत बांधून लोक पाहती, गेलो निसटून या मी केल्या अपराधातून सुटेन, मोदे शिक्षा भोगून प्रेमल हाती व्हावे अर्पण प्रतिक्षेत त्याच्या आहे थांबून बोलती जन मजला निंदून  शेवटास मी बसून राहीन काळ बेला गेली निघून बाजार जडाचा गेला भंगून  बोलविण्यास...

स्मृतीबनातून अखेरचा आलाप(पद्य)

इमेज
  58. Let all the strains of joy mingle in my last song - the joy that makes the earth flow over in the riotous excess of the grass, the joy that sets the twin brothers, life and death, dancing over the wide world, the joy that sweeps in with the tempest, shaking and waking all life with laughter, the joy that sits still with its tears on the open red lotus of pain, and the joy that throws everything it has upon the dust, and knows not a word. अखेरचा आलाप अखेरच्या माझिया या मुक्त मैफिलीत राग रागिण्या सर्व त्या गाऊ देत मोदात धरा ही मस्त हासते रे  तरु लता तृणाने कशी बहरून येते उन्मत्त एकत्र जन्म मरण नाचते रे  शेष गीतात तो आनंद असो रे  वाहे आनंद तो तुफान वादळाच्या गतीने करी खडबडून असे या जीवास जागे  दुःख व्यथा रूपे नेत्र जलात विलासे  विलयी मुखातूनी एक न शब्द बोले वाहोत आनंद लहरी अखेरच्या या आलापातून जीवन सर्वस्व द्यावे स्वामी चरणी ठेवून (मूळ बांगला १३४ इंग्रजी 58) नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  180320251600

स्मृतीबनातून अखेरची मागणी(पद्य)

इमेज
जीवन जखन शुकाये जाय अखेरची मागणी जीवाची मम होईल काहीली  होता निरस, मन, वचन, वैखरी शुष्क अशा माझ्या जीवनी जाई घन आषाढासम बरसुनी सरता हृदयी माधवी मधुपर्क येई घेउनी स्वर सुधारस अर्क हे रसेश्वर हो करुणाघन  मधुरसात टाक ह्रदयाला मुरवून कर्मकर्कशता येता, भक्ती लोपून हळूच पावली हृदयी येऊन वावटळीस त्या  तिथेच नमवून निर्मल प्रसन्न करी तू जीवन अनुदारीता गेली कधी मनास व्यापून उदार नाथा ये तू धावून कृपा करी मजवर तेथे राहून देई जगताला हे तू दाऊन  नोहे घर रंकाचे आपितु राजभवन अन् अखेरीस मागणे हे पण क्षुद्र वासनाचे करी निर्दालन आलोकी ने मज काळोखातून नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  160320251335

स्मृतीबनातून चिंता (पद्य)

इमेज
चिंता दिनरात मला एक चिंता जाळते न उतरवी मनातून कधी प्रेमले  मम जीवनाचा तेवणारा दीप हा दुःख वादळी अशा विझेल का? खोल जखमा उरीच्या पोळू नये हृदयातील आग त्यांना जाळू नये दबक्या स्वरातील माझ्या वेदनेचा हुंदका भान हरवून न हो चालता सांगू कुणा मी माझी व्यथा ह्रदयही माझे, नाही माझे आता दुविधेत मी घेरलो आहे असा कथेचा न व्हावा विषय हा दीप मी असा आहे जगी  जो तेवतो परी आलोक नाही मनात असते माझ्या ही टोचणी कामना करपून न जाओ अंतरी    नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  250320250800 (Inspired by the great song of Mukesh मुझे रात दिन ये ख्याल है penned by Hasarat Jaipuri for the film Umar Quid. My sincere tributes.) मुझे रात दिन ये ख्याल है मुझे रात दिन ये ख्याल है वो नज़र से मुझको गिरा न दे मेरी ज़िन्दगी का दिया कही मेरी ज़िन्दगी का दिया कही ये गमो कीआंधी बुझा न दे मुझे रात दिन ये ख्याल है मेरे दिल के दाग़ न जल उठे मेरे दिल के दाग़ मेरे दिल के दाग़ न जल उठे कही मेरे सीने की आग से कही मेरे सीने की आग से ये घुटी घुटी मेरी आह भी ये घुटी घुटी मेरी आह भी कही होश मेरे गँवा न दे मुझे रात दिन...

स्मृतीबनातून बंधमुक्त(पद्य 37)

इमेज
Nishar swapon chhutlo re, ei chhutlo re, tutlo bnaadhan tutlo re. Roilo na aar aaral praane, beriye elem jagot-paane - Hridoyshatodaler sakol dalguli ei phutlo re, ei phutlo re. Duwar aamar bhenge sheshe    dnaarale jei aapni ese Nayonjale bhese hridoy charontale lutlo re. Aakash hote probhat aalo aamar paane haat baaralo, Bhaanga kaarar dwaare aamar    jayodhwoni utthlo re, ei uthlo re. रविंद्रनाथांच्या मूळ बांगला गीतांजलीतल्या ३७ व्या गीताचा मराठी भावानुवाद.  बंधमुक्त ओसरले आता स्वप्न निशेचे  बंध सारे तुटले रे  जीवा नाही कुठले बंधन कोश सोडुनी विश्व विचरण  हृदयाच्या शतदल कमलातुन  एकेक पाकळी आली उमलून साक्षात स्वये दिलेस दर्शन नेत्रदव भिजवी हृदयी श्रावण तुझ्याच चरणी घाली लोटांगण स्पर्श आतुर आकाशी किरण भग्न अशा माझ्या हृदयातून  उठेल आता जयघोष गर्जून नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  090320250510

स्मृतीबनातून सायुज्य मुक्ती(पद्य)

इमेज
I know thee as my God and stand apart - I do not know thee as my own and come closer. I know thee as my father and bow before thy feet- I do not grasp thy hand as my friend's. I stand not where thou comest down and ownest thyself as mine, there to clasp thee to my heart and take thee as my comrade. Thou art the Brother amongst my brothers, but I heed them not, I divide not my earnings with them, thus sharing my all with thee. In pleasure and in pain I stand not by the side of men, and thus stand by thee. I shrink to give up my life, and thus do not plunge into the great waters of life. सायुज्य मुक्ती देवता मानून तुजला, राहतो मी दूर उभा आत्मीय मानून नाही, कधी आदरी मी तुला  मानतो मी तुजला पिता, अन् लोटांगणही घालतो बांधव मी मानून तुजला, नाही कधी कवटाळीतो स्वामित्व तू सोडुनी कधी, सहज आम्हात मिसळशी सौंगडी म्हणुनी तुला, कधी धरिले नाही छातीशी देवा तू रे अमुचा, भ्राता असशी खरोखरी सकल विश्वातील मानव बंधूंच्या, हृदयामाजी तू विराजशी  देखोनि त्या सकलांना, पहावे तुझेच त्यात रूप  ...

स्मृतीबनातून काळीजव्यथा (पद्य)

इमेज
काळीजव्यथा निशब्द तिथे राहणे बरे  विपर्यास केला जातो जिथे करुनी जखमा उरी जाणीवेने मोजली खोली जाते जिथे का बोलाव्या काळीजव्यथा त्यांच्याकडे? मलमातही विष घोळती जिथे का मागसी प्रीती सन्मान कुणाकडे? दिलदार  कद्रदान  आता उरले कुठे? कुणी शैलेंद्र नावाच्या एका वाचकाने हिंदी भाषांतराची मागणी ब्लॉगवर दिलेल्या अभिप्रायात लिहिली आहे. त्या विनंती नुसार केलेला हा प्रयत्न.... शब्दहीन रहनाही ठीक हैं व हाँ विपरीत लिया जाता हो  जहाँ सोच समझकर करते है घाव कई  और फिर नापते है उनकी गहराई कैसे कहें दिल ए दर्द उनसे  जो आदतन मिलाते जहर मलहम में  कैसे उम्मीद करे प्रीत और सन्मान की य हाँ दिलदार  कद्रदान  अब दुनिया मे बचे है क हाँ  ? 210320250930 नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  200320250930

स्मृतीबनातुन तक्रार (पद्य)

इमेज
  तक्रार मान वेळावुनी तू अशी पाहू नको पाहताना किमान गोडशी तू हासू नको का उगा खेळशी तू कुंतलांच्या लटांशी हरकतीने अशा काही करीती हेवा अनामिकेशी काय मी तुझी काढली सांग छेड नर्तनानी नेत्र दलांच्या का लाविते वेड चालणे ही तुझे हे असे जीवघेणे कानी यावे सुरेल जैसे सौदामिनी तराणे बोलणे तुझे की श्रोत्यास मधुपान  गारूड होई ऐसे काही विसरती देहभान लावून सृजन ते पणाला दिधले तुला सर्वकाही घडवित्या त्याला तरीही कसे मानावे समन्यायी? नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  130320251820 हुताशनी पौर्णिमा  

स्मृतीबनातून विश्वगान (पद्य ३६/70)

इमेज
Is it beyond thee to be glad with the gladness of this rhythm? To be tossed and lost and broken in the whirl of this fearful joy?     All things rush on, they stop not, they look not behind, no power  hold them back, they rush on.     Keeping steps with that restless, rapid music, seasons come dancing and pass away––colours, tunes, and perfumes pour in endless cascades in the abound- ing joy that scatters and gives up and dies every moment.(पारबी ना की जोग दिते  ३६/70) वविश्वगान विश्वगान हे सुरेल सुंदर का न मिळविशी सुरात सूर? आनंदी इथल्या लहरीं मध्ये तुटून मोडून झोकून द्यावे दिला कान तर ऐकू येतील गगनी यमवीणेचे सूर सुरेल चंद्र,सूर्य तारकाsही येथील मोदे, नित्य धावतात उज्वल दिग्गज सारे कलावंत हे अजर स्वरांचे छेडून गाणे चराचरास अवघे करून वेडे सांगणार कोण, जातात कुठे? या मोदाच्या ताला वरती  सहा ऋतू हे नाचत येती रूप गंध नजराणा देती चरात मिसळून विरून जाती पदन्यास कर या ठेक्यावरती नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  070320251525 (गीतांजली मूळ बां...

स्मृतीबनातून अतिथी(पद्य)

इमेज
Sharote aaj kon otithi elo praaner dwaare. Aanondogaan gaa re hriday, aanondogaan gaa re. Nil aakesher nirob kotha shishir-bheja byakulata Beje uthuk aaji tomar binar taare taare. Shashyakheter sonar gaane jog de re aaj saman taane, Bhaasiye de sur bhara nodir amol jalodhaare. Je esechhe taahar mukhe dekh re cheye gobhir sukhe, Duwar khule taahar saathe baahir hoye ja re. परमेश्वर भक्तीचा शरद ऋतू एकदा का भक्ताच्या आयुष्यात अवतरला की भवबंधन, भवताप शीतळ होतो. तो सहजीच प्रभुसेवेत लीन होतो हेच गुरुदेव टागोर यांनी  या कवितेतून व्यक्त केलं आहे.  अतिथी शरद ऋतुचा मुहूर्त साधून हृदय मंदिरी आला कोण? गाऊया रे आता  आनंदगान  गाऊया आनंदगान  निरभ्र नीलनभ कहाणी नीरव त्यात विखुरले व्याकुळ शिशिर दव  मिसळून त्यात तव वीणेचा रव  ऐकू येऊ दे प्रसन्न गुंजारव गर्भार धरती सोन गाणे सूर मेळवित गाती तराणे निर्मल पावन संगीत लेणे  झोकून जीवन सरितेत वाहणे  न्याहाळ दिव्य अतिथीचे मुख दिसेल सखोल अंतरंगीचे सुख झुगार आता सर्व भवबंधनं  स्वीकार त्याला हृदया प...

स्मृतीबनातून कातरवेळ(पद्य 18)

इमेज
ईश्वरभक्त, मुमुक्षु किंवा अगदी साधकाला ही  व्यवहारात वावरताना काही वेळा भगवंताचा विसर पडू शकतो. पण मोहपाशामुळे अडचणीत आल्यावर, एकटं पडल्यावर पुन्हा एकदा त्याला परमेश्वर आठवतो. भवतापात दग्ध झालेल्या अशा भक्ताना, मुमूक्षूंची भावना गुरुदेव टागोर, गीतांजलीतील या कवितेतून मांडतात. इंग्रजी  कविता आणि तिचा भावानुवाद... Clouds heap upon clouds and it darkens. Ah, love, why dost thou let me wait outside at the door all alone? In the busy moments of the noontide work I am with the crowd, but on this dark lonely day it is only for thee that I hope. If thou showest me not thy face, if thou leavest me wholly aside, I know not how I am to pass these long, rainy hours. I keep gazing on the far-away gloom of the sky, and my heart wanders wailing with the restless wind. (गीतांजली मूळ बांगला १६ इंग्रजी 18) कातरवेळ मेघां वरती मेघ दाटले काळोखाचे राज्य व्यापले कसे ठेविसी एकल्यास मज कातरवेळी घरट्या बाहेर दिनरात मी नाना व्यापे  व्यग्र राहिलो नाना लोके  आता मात्र नेत्र लागले आहे केवळ तुझ्या...

स्मृतीबनातून साहित्य...महाकुंभ...अयोध्या...गालिब

इमेज
साहित्य...महाकुंभ... अयोध्या...गालिब   - एक रोजनिशी दिवस पहिला(19.02.25) मुंबई हजरत निजामुद्दीन 12909 गरीब रथ सकाळी 10.20 ल नियोजित वेळी दिल्लीत पोहोचली. साहित्य संमेलन, प्रयागराज कुंभमेळा, अयोध्या असा बृहद् पर्यटन प्लान असला तरी  अमुक वेळ गाठायची असं दडपण संमेलन उद्घाटन सोहळा वगळता नसल्यामुळे आगळाच निवांतपणा अनुभवत होतो. अचानक जाणवलं की आजवरच्या आयुष्यात कदाचित असं पहिल्यांदाच घडत होतं.  एखादं लक्ष्य गाठण्यासाठी आपण स्वतःच स्वतःला किती शिणवून घेत असतो? उशिरा का होईना याची आज जाणीव झाली याचं मनात कुठेतरी समाधान वाटलं. त्यातच कोरोना काळा सकट; गेली पाच वर्ष दिल्लीनी मला खूप छान सांभाळलं. महाराष्ट्राला डावलण्याचा ठपका दिल्लीवर पूर्वापार ठेवला जातो. मात्र बहुतेक मराठी जन; विशेषतः मुंबई पुण्याचे मूळ निवासी(रागावू नका) हे दिल्लीत अस्वस्थ मनाने आणि उगाचच बिचकुन वावरतात असं माझं निरीक्षण आहे. सेवा कालाच्या शेवटच्या टप्प्यात मी एकटाच दिल्लीत होतो आणि दिल्लीत कार्यालय किंवा अन्यत्र माझा, मराठीचा आणि महाराष्ट्राचा सकारात्मक ठसा उमटवून वावरू शकलो याचं एक प्रकारे समाधान आहे....