स्मृतीबनातून – सौंदर्या (पद्य)


सौंदर्या



तू प्राचीचा लालिमा तू गोधूलीचा चंद्रमा

जातसा तू कुठेही काळोख होई नाहीसा


तूच असशी धुंद मैफलीची तेजस्विता

नसता तू कशी सर्वत्र पसरे खिन्नता


तू स्वरमयी चांदणे, तू गीताची गेयता 

मुग्ध होतात सारे तुझे गायन ऐकता


येता तू समोरी कुणी भानावर राहिना 

सुधा चषक ओठी अन्य कामना उरेना


बघाया तुला जमले लाखों इथे दिवाणे

वाटले येवो नशिबी माझ्याच हे चांदणे


मनोवेदनेची दूर करण्यास काजळी

हृदयी तव स्मृतीची मंद ज्योत तेवावी 

नितीन सप्रे

07032026





टिप्पण्या

  1. खरं तर ही कविता गीत होऊन रसिकासमोर यायला हवी इतकी ती सुंदर आहे.
    नितीनजी धन्यवाद या कवितेसाठी.

    उत्तर द्याहटवा
  2. वृत्तबद्धतेचे कसोशीने पालन करत अगदी नेमके शब्द वापरून केलेल्या ह्या गीताचे कौतूक करावे तितके कमी!!
    चांगल्या संगीतकाराच्या नजरेस हे गीत नजरेत पडो आणि गीतास सुरेल अवीट गोडीची चाल- संगीत रूपी सरगमीची शाल पांघण्यास मिळो ही सदिच्छा!!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून–सुधीर स्वरलालित्य

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती