स्मृतीबनातून – सौंदर्या (पद्य)
सौंदर्य
जाता तू कुठेही काळोख होई नाहीसा
तूच असशी धुंद मैफलीची तेजस्विता
नसता तू कशी सर्वत्र पसरे खिन्नता
तू स्वरांचे चांदणे, तू गीताची गेयता
मुग्ध होतात सारे तुझे काव्य ऐकता
असता तू समोरी कुणी भानावर राहिना
चषक ओठी सुधेचा अन्य कशाची कामना?
बघाया तुला जमले लाखों इथे दिवाणे
नाव माझेच मग कसे बदनाम झाले?
हृदवेदनेची दूर करण्यास ती काजळी
मंद दिव्याची ज्योत हृदयी तुझी तेवावी
नितीन सप्रे
07032026

छान!!
उत्तर द्याहटवाछानच !
उत्तर द्याहटवाखरं तर ही कविता गीत होऊन रसिकासमोर यायला हवी इतकी ती सुंदर आहे.
उत्तर द्याहटवानितीनजी धन्यवाद या कवितेसाठी.
वृत्तबद्धतेचे कसोशीने पालन करत अगदी नेमके शब्द वापरून केलेल्या ह्या गीताचे कौतूक करावे तितके कमी!!
उत्तर द्याहटवाचांगल्या संगीतकाराच्या नजरेस हे गीत नजरेत पडो आणि गीतास सुरेल अवीट गोडीची चाल- संगीत रूपी सरगमीची शाल पांघण्यास मिळो ही सदिच्छा!!