पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृतीबनातून-पाऊस🌧️💦(पद्य)

इमेज
नैऋत्य मौसमी पावसाचं दोन दिवसांपूर्वी रविवारी आगमन झालं. गेल्या 62 वर्षात प्रथमच तो मुंबई आणि दिल्लीत एकाच दिवशी अवतरला आहे. पावसाचं आगमन धरतीची कळाच बदलून टाकतो… पाऊस 🌧️💦 धरेच्या भेटीस पाऊस आला भूमी सुस्नात करुनी गेला लता सुमनांनी शृंगार केला  सृष्टीवरी सुरू मेघमल्हार झाला वसुधेने हिरवा शालू ल्यायला जलानी झऱ्यांच्या बुट्टी काढल्या मेघांनी कृष्ण रंग ओढला चिंब गारवा हवेत आला कृषक राजा सज्ज जाहला ओल्या मृदेत जीव पेरला बीजास आता कोंब फुटला जीव त्याचा सजीव झाला तरुणाईला ही मोहर आला मनी मधूर भावना दाटल्या हृदयांनी प्रीत राग छेडला वर्षा सुरात सूर मिसळला नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com नवी दिल्ली (2706230745)

स्मृतीबनातून-स्वप्न(पद्य)

इमेज
'जे न देखे रवी ते देखे कवी' ही उक्ती तर सर्वश्रुत आहे. याच धर्तीवर 'जे न घडे प्रत्यक्षात कवी पाहतो स्वप्नात''… स्वप्न कधी वाटते ऐसे घडावे मला प्रेमभावे तूही पहावे होईल अपुली भेट जेव्हा हरपावे जगाचे भान तेव्हा चांदणे रात्रीत पिऊन घ्यावे मिठीतुन सूर्यास अर्घ्य द्यावे घडेल हे तेव्हा घडावे तोवरी किमान स्वप्नी रमावे नितीन सप्रे नवी दिल्ली nitinnsapre@gmail.com (2306232035)

स्मृतीबनातून - खेळ(पद्य)

इमेज
ऐन रंगात असलेला डाव तसाच सोडून देत  दिवेलागणीची वेळ झाली की लहानपणी घरी परतावं लागत असे. यावरून मनात झालेली विचारांची गर्दी हळूहळू पांगती झाली.  मात्र  एक विचार शब्दात रुजला. पाहा तुम्हाला रूचतो का?... खेळ (फोटो - नेहा सप्रे) चला तिन्ही सांज झाली परतण्याची घरी वेळ झाली आवरूनी घे व्यर्थ खेळाचा पसारा दिवेलागणीची आता वेळ झाली नित्य नवे खेळ शिकलास खेळूनी खूप तू भागलास समजून खेळ आपुल्या परीस  जिंकण्याचा डाव, केला प्रयास उन्माद जीत, विषाद हार दोन्हीतही नसे काहीच सार चल माघारी आता फिर अर्पून टाक देवास भार जाणून घे एक सत्य हार जीत असे असत्य खेळूनी इथे नेटका खेळ परतायचे घरी, होताच वेळ नितीन सप्रे नवी दिल्ली nitinnsapre@gmail.com   (2206231745)

स्मृतीबनातून-रहस्य(पद्य)

इमेज
सकाळी उठता उठता कैफी आझमी यांची जगजीत सिंह यांनी गायलेली  'अर्थ'पूर्ण गझल,  'तुम इतना जो मुस्कुरा रहे हो'  मनात सुरू झाली. पूर्वी पाहिलेला एक फोटो ही मनात घर करून होता. एखाद्याच जीवन वरकरणी कितीही सुरळीत वाटलं तरी त्याच्या अंतरंगीच रहस्य काही वेगळंच असतं. अनेकदा जवळचे म्हणवून  घेणाऱ्यांनाही त्याचा गंधही नसतो. जर ते जाणता आलं तर, ते असं तर नसेल?... रहस्य धडाडली चिता माझ्या या जीवनाची लाभली निरव शांतता होता मृत्युगामी जळलो असा जीवनी लाख वेळा चितेवरी त्या निमाल्या उष्णतेच्या झळा  फिरलो जगी अपेक्षांची घेऊन झोळी देखिली त्यांची जाहलेली फक्त होळी भिऊनी ज्यास कंठीले आयुष्य सारे समजले अखेरीस, मृत्यू मुक्तीद्वार न्यारे हाय शेवटी कळले रहस्य जीवनाचे उशिरा तरी कळले समाधान त्याचे नितीन सप्रे नवी दिल्ली nitinnaapre@gmail.com (2006230756)

स्मृतीबनातून-चित्र(पद्य)

इमेज
  चित्र मनी असे जे सगळे बोलायाचे नसते मर्म यास यशाचे मानले कधीच नव्हते दाटला असता अंतरी अपुल्या कल्लोळ भावनांचा शमवायचा मनातच मग भार का सोयाऱ्यांचा? तट पार करावयास बसती नावेत सारे डगमगता ती प्रवाही कोसण्यास सज्ज सारे चित्र या जीवनाचे दिसते जर असेच रंग त्यात भरण्यास झटावे का उगीच? नितीन सप्रे नवी दिल्ली nitinnsapre@gmail.com   (1806230820)

स्मृतीबनातून-पाहातों वाटुली पांडुरंगे

इमेज
पाहातों वाटुली पांडुरंगे तू माझी माऊली हा अभंग अगदी लहानपणापासून माझ्या कानात झिरपत आला आहे. गोड गळ्याच्या छोटा गंधर्व(सौदागर नागनाथ गोरे)या महान गायकानी गायलेल्या तुकोबारायांच्या या अभंगानी, कुठल्याही संस्कार वर्गाची झूल न पांघरताच लयीच्या झुल्यावर झुलवित मनावर अगदी बेमालूमपणे संस्कार केले. याच बरचसं श्रेय अर्थातच आकाशवाणीला आहे. आकाशवाणीनं मनोरंजना बरोबरच मनोविकास आणि  ज्ञानरंजनाच्या हातात हात देत वैचारिक विकास साधण्याचं आकाशा एवढं मोठं काम केलं आहे. लहानपणी शाळेची तयारी करत असताना किंवा काहीवेळा तर अंथरुणातून बाहेरही पडलो नसताना आकाशवाणी वरच्या पहिल्या सभेत भक्ती संगीताचं जो कार्यक्रम सुरू असायचा त्यामुळे अनेक उत्तमोत्तम गायकांची गाणी आपसूक कानावर पडत. वास्तविक आज गाण्यातलं, कवितेतलं जे काही थोडं बहुत कळतं असं वाटतं, ते ही त्यावेळी काही कळत नसे. कानाला गोड लागत आणि पुन्हा पुन्हा ऐकायला मिळत म्हणून आज पन्नाशी उलटली तरी त्यांची मोहिनी अगदी तशीच आहे किंबहुना ती अधिकच वाढली आहे. त्यावेळी लक्षात न आलेली या गीतांची अनेक वैशिष्ट्य आता थोडी फार उमजायला लागली आहेत.     मनु...

स्मृतीबनातून-सोहम(पद्य)

इमेज
पहाटे उठतांना मनात सहजच आलेला विचार पहाट फेरी दरम्यान मनात घोळतच राहिला आणि नंतर त्यानं  धारण केलेलं शब्दरूप आपणा सर्वांच्या अभिप्रायार्थ... सोहम आयुष्य म्हणजे गूढ कोडे वाटते संपता संपता थोडे उमजू लागते शैशवी मातापिता आदर्शवत भासती तरुणाईच्या उंबऱ्यावर मागास ते वाटती मैत्र, स्त्री, कलत्र सर्वस्व होऊ पाहते हेही असती फुकाचे कालांतराने हे उमजते इथे जो तो आपापला हे कळू लागते 'त्वमेव सर्वस्व' आता हळूहळू पटू लागते भैरवीचे सूर जेव्हा आयुष्य आळवू पाहते कोहमचे उत्तर सोहम तेव्हा मिळू लागते नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com   नवी दिल्ली (1406230830)

स्मृतीबनातून-प्रश्न ?(पद्य)

इमेज
यंदा काहीसा शितळ राहिलेला उन्हाळा गेले दोन दिवस आपल्या मुळपदी जातो आहे. उष्ण दुपारी मनात उमटलेले प्रश्न... प्रश्न ? (फोटो - नेहा सप्रे) असे कसे कुणी हसायचे साहतांना त्या वेदना आवरायचे हुंदक्यांना अन् कसे सर्वस्व अपुले गमवताना   केले जीवाचे रान होते घर सान सजविताना  काय झाले ना कळे भासतो आता एकलपणा हीत ज्यांचे होते साधले हात तेच झिडकारती हे असेच घटले होते वाल्यासंगे तेव्हा काही जीवन सत्य असेच असते गमते हे सर्वांना का न चरण धरावे हरीचे जीवन जगताना नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com   नवी दिल्ली (0906231650)