पोस्ट्स

स्मृतीबनातून–सुधीर स्वरलालित्य

इमेज
  सुधीर स्वर–लालित्य योग आणि गुण  यशोशिखरावर आरूढ व्हायचं असेल तर काही योग जुळून यावे लागतात तसच काही गुण व्यक्तिमत्त्वात असावे लागतात. योग म्हणाल, तर अगदी अजाण वयात गुण हेरू शकतील अशी मंडळी आसपास असणं, हेरलेले गुण विकसित व्हावे यासाठी त्यांच्या कडून कृती होणं, उत्तम गुरू लाभणं, नियती आणि त्याबरोबरच दैवी कृपा लाभणं अशी यादी देता येईल आणि गुण म्हणाल तर गुरूनिष्ठा, तन्मयता, मेहनतीची तयारी, मन–बुद्धीची तरलता, अशा बाबी सांगता येतील. कोल्हापुरात 25 जुलै, 1919 साली जन्मलेल्या रामचंद्राच्या बाबतीत हे योग तसंच गुण, छान जुळून आले. दारावर येणाऱ्या बैराग्यांनी गायलेली भजनं, कवनं, गाणी यांची सही सही नक्कल अडीच तीन वर्षांचा राम करीत असे. त्याचं घराणं हे निस्सिम राष्ट्रभक्त. वडील व्यवसायानं वकील. कोल्हापुरातील टिळक असा नावलौकिक कमावलेला. छोट्या रामाची गायन कले मधली रुची आणि गती त्यांनी वेळीच हेरली. (वडील) सुदैव असं की त्याच्या दोन्ही मामांनी सुद्धा त्याला गायन शिकवण्यासाठी अनुकूल भूमिका घेतली आणि अवघ्या सहाव्या वर्षी या रामलल्लाला त्याचे वडील गानवासासाठी वामनराव पाध्येबुवां कडे पाठवते झाले....

स्मृतीबनातून – तालवाद्यांचा तालेवार

इमेज
तालवाद्यांचा तालेवार  ‘ लॉर्ड्स ऑफ रिदम’ आपल्या अंगीभूत आणि जोपासलेल्या तालवाद्यातील निपुणतेनं हिंदी चित्रपट सृष्टीवर 1947 ते 1987 अशी चार दशकं, पिता कावस आणि दोन मुलं बर्जोर आणि केरसी लॉर्डस  या परिवारानी अधिराज्य गाजवलं. या दरम्यान ध्वनिमुद्रित/चित्रित झालेल्या प्रत्येक तिसऱ्या गाण्यात या परिवारतील या तीन सदस्यांपैकी कुणी न कुणी वाद्य वाजवलं आहे अशी माहिती मिळते. कावस लॉर्ड तर पहिला बोलपट आलम आराच्या निर्मिती पासूनच या क्षेत्रात कार्यरत होते. इतकंच नाही तर ताल वाद्यं किंवा आघातानी ध्वनी निर्माण होणारी वाद्यं ही भारतीय चित्रपट संगीत सृष्टीला त्यांची देण आहे असं ही माहितगार सांगतात. तर केरसी या बर्जोरच्या भावानं, डिजिटल म्युझिक इक्विपमेंटचा या संगीत विश्वाला परिचय करून दिला. स्वतः बर्जोर लॉर्ड्स यांना नानाविध तालवाद्यं वाजवण्यात सिद्धहस्तता प्राप्त झाली होती. ड्रमस व्यतिरिक्त ते काँगो बाँगो, घुंगरू, झायलोफोन, व्हायब्रोफोन, लाकडी ब्लॉक्स अशी कितीतरी वाद्ये अधिकारपूर्वक वाजवित. ऑक्टोपॅड तसंच इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड वाजवण्यातही ते पारंगत होते. आपल्या बॉलिवूड कारकिर्दीत त्यांनी शेकड...

स्मृतीबनातून –वारी(पद्य)

इमेज
वारी पंढरी जाईन आनंदें नाचून विठुला भेटेन चरण धरीन घेऊन दर्शन होऊनी लीन  देहबुद्धी म्लान  चंद्रभागी धुऊन अहंता सांडून कीर्तनी रंगीन  घडव सुजाण  प्रसाद घेईन  दे आशीर्वचन  कृपा भगवान तू समचरण  आनंद निधान  नितीन सप्रे   060720250640 आषाढी एकादशी

स्मृतीबनातून –गान प्रभाकर

इमेज
गान प्रभाकर गान संस्कार निसर्ग संपदेच्या बाबतीत गोमंतक प्रांत जसा भाग्यवान आहे तसाच विद्या संपदा, कला संपदेच्या बाबतीतही गोव्यावर देवी सरस्वतीचा विशेष वरदहस्त आहे. अनेक विद्वान, कलाकार या भूमीशी आपलं नातं सांगतात. याच गोव्यातल्या मूळ म्हापसा परिसरातील पण मडगाव इथे स्थायिक झालेल्या एका कुटुंबात गान सरस्वतीचा वरदहस्त लाभलेलं मूल 4 जुलै,1944 ला जन्माला येतं आणि निष्ठा पूर्वक गान साधना करून गायन क्षेत्रात घराण्याचा नावलौकिक वाढवतं. उपजिविके साठी सोनारकाम आणि जीवनासाठी संगीत अशा परिवेशात जन्माला आलेल हा मुलगा संगीतासाठी निष्ठापूर्वक मेहेनत करून आयुष्याचं सोनं न करता तरच नवल. घरी दर गुरुवारी भजन गायनाची प्रथा होती. वडील स्वतः भजनं म्हणत. आपल्या बारा चौदा वर्षांच्या दोन्ही मुलांनाही भजन गायला सांगत. मोठा नारायण पेटी वाजवायचा तर धाकटा थोडं बहुत गात असे. एकदा मडगावच्या नोवेरा शाळेत शिकणाऱ्या या मुलाला वर्गात बाकड्यावर ठेका धरून गाताना मास्तरांनी ऐकलं आणि त्याला शिक्षकांच्या खोलीत भेटायला सांगितलं. आता शिक्षा होणार या अपेक्षेने गेलेल्या या मुलाला मास्तरांनी शाळेच्या गॅदरिंग मध्ये एक दोन गाणी म्ह...

स्मृतीबनातून मृत्यू(पद्य ११६/91)

इमेज
​रवींद्रनाथ टागोर या गीताद्वारे सांगतात की, मृत्यू हा भीतीदायक नसून तो जीवनाचा  'परम सखा'  आहे. ज्याप्रमाणे एखादी नववधू आपल्या पतीची आतुरतेने वाट पाहते, त्याचप्रमाणे कवी मृत्यूची वाट पाहत आहेत. जीवनाचा प्रवास संपवून मृत्यूच्या कुशीत विलीन होणे म्हणजे ईश्वराशी एकरूप होणे होय, असा अनेक आध्यात्मिक संदेश यात दिला 116 बंगाली  ​ओगो मरण, हे आमार मरण, तुमि आमाय कथा कओ। तपोमय येइ तोमार शरण, तुमि आमाय कथा कओ॥ ​कतो ये दिन धरे, आमि तोमार पथे-चेये आछी कतो दुखे सुखे, आछी कतो गान गेये। तोमार चोखेर एकेकटी निमेषे, आमार सकल कथा जालिये देबे तोमार चोखेर, एकेकटी निमेषे॥ ​या-किछु आमार सब तुमि लओ, ओगो मरण, हे आमार मरण। गूँथा हयेछे फुलेर माला, कबे हबे ये बासर-घरे। कबे आमि ये याब चले, तोमार साथे निभृत घरे॥ 91. इंग्रजी  O thou the last fulfilment of life, Death, my death, come and whisper to me! Day after day I have kept watch for thee; for thee have I borne the joys and pangs of life. All that I am, that I have, that I hope and all my love have ever flowed towards thee in depth of secrecy. O...

स्मृतीबनातून – भरती(गीतांजली पद्य ९)

इमेज
​ही कविता सांगते की, ईश्वर हा केवळ मंदिरात नसून तो निसर्गाच्या कणाकणात आणि मानवाच्या आनंदाच्या लहरींमध्ये व्यापलेला आहे. जेव्हा माणूस सृष्टीच्या या अथांग सौंदर्याशी एकरूप होतो, तेव्हा त्याला खऱ्या आनंदाची आणि ईश्वराची प्राप्ती होते. आनंदेरई सागर थेके एसेछे आज बान दाओ गो सभाय छेड़े दाओ गो, भरे निओ गान। आलोक-छायार महामेलाय, आमिओ जे एक कोना, धूलि-कनार माझे आमार आपनके जे जाना। एइ जे आकाश, एइ जे बातास, एइ जे आलोक-धारा सकल सुखेर माझे आमि हयेछि आत्महारा। जेइ दिके तेइ ताहार पावा, जाहार शेष नेइ कभु, आपनार माझपाने ताहारेई खुँजे पावा प्रभु। भरती आनंदेरई सागर थेके (९) आनंद सागरास आज भरती आली वल्हवा जीवन नौका तुम्ही दृढ राहुनी घ्या लादून नौकेत ती दुःखे सारी निर्धार पार जाण्याचा पातला मृत्यू जरी आनंद सागरास आज अशी भरती आली कोण रे तो मागुती फिरण्यास सांगतो कोण रे तो अशी मनाई करतो उत्सव काळी कोण भयाचे स्मरण करतो भय तुमचे ते आम्ही सर्व जाणतो कुठली ग्रहपीडा अन् कुठला शाप तो? सुखे किनारी का बसून राहण्यास सांगतो? धाडसाने धरा रे शिडाच्या दोऱ्या सर्व गाऊ या मिळून सुरेल गीत पर्व आनंद सागरास आज अशी भरती आली नि...

स्मृतीबनातून – मायारूप (पद्य ११०)

इमेज
​गुरुदेव टागोर यांना असे म्हणायचे आहे की, जरी त्यांचे अस्तित्व एका लहानशा 'मातीच्या पणती' सारखे असले, तरी जेव्हा त्यांच्यावर ईश्वराची असीम कृपा आणि आकाशासारखी विशाल करुणा बरसते, तेव्हा त्यांचे रिकामे जीवनही दैवी प्रकाशाने उजळून निघते. हे काव्य म्हणजे पूर्ण समर्पण आणि समाधानाचे गीत आहे. ​ आछे आमार हृदय आछे भरे ओगो, तोमार दान ओइ आकाश-भरे। आछे आमार हृदय आछे भरे।। ​ आमार एइ ये माटीर प्रदीपखानि जेने निले तोमार आलोर बानी, ओगो, तोमार नक्षत्र-प्रदीप-शिखाय जागलो आमार शुन्य घरे।। मायारूप हृदय माझे तव प्रेमाने ओसंडले कर देवा तुझ्याच मनीचे सारे असता तू सदा अंतरी नेमाने घे हरून खुशाल बाह्यांगी सुखे करुनी नष्ट तहान प्राणाची येथे पिपासेतून मी मुक्त व्हावे असे मग मरूभूमीतही तू घेऊनी जावे तप्त रणात मजसी खुशाल फिरवावे मायेचा जो खेळ तुझा चाललासे  सांगतो तुला मला आवडीचा वाटे व्हावा अश्रूपात तो एक नेत्राने दुजा ओसंडून वाहे अतीव मोदे  सर्वस्व ते गमावून बसलो भासे गवसते दिव्य त्यावेळी अधिक ते लोटसी दूर तव अंकावरूनी कोठे उचलून हृदयी घेणार मजसी खासे  आछे आमार हृदय आछे भरे ११० https://youtu.be/iF...