पोस्ट्स

स्मृतीबनातून –स्वरशब्द स्मृती(पद्य)

इमेज
स्वरशब्द स्मृती सुमन हे असे कोणते स्वरशब्द छान जाणते  वाऱ्यावरती घेत लकेरी  गातात जणू जल लहरी सहज असे कधी दुपारी आपणास ते गुपित सांगी  मृदुल करांनी हळूवार  छेडित जाते हृदय तार आस अंतरी आहे सांगते आसरा हृदयात मागते  सख्याचे एक गीत ऐकते स्वरांनी धुंद होऊन जाते शब्द शब्द ते ठेवी जपून बकुळीच्या सुगंधा समान केतकी बनी नाचे मयुर नभात मेघ गहिवरत दारी मग पडता पाऊस मातीचा सुगंध पसरत सागरास धरणी मिळते तिथे आपुली वाट पहाते नयन बोलता काहीतरी ते खुळे हासते खुळ्यापरी काहूर मनी येते दाटून दिनरात तयाला स्मरून झरती त्या झिमझिम धारा रात कधी ती उदास जाता विचारे आठवते का सारे?  मन दवात होता हळवे पहिलीच जशी भेट होते दो नयनांची जादू घडते उघडी एक चंदनी दार सजवते सोन्याचा संसार गेले जरी ते आता विरून क्षणोक्षणी होईल स्मरण नितीन सप्रे 040620261030

स्मृतीबनातून –सजण दारी उभा

इमेज
  सजण दारी उभा लवचिकता हा भाषेचा स्वभावधर्म आहे. जशी वळवावी तशी ती वळत जाते. एकाच शब्दाला अर्थाच्या कितीतरी छटा असू शकतात. ही भाषेची श्रीमंती मानली जाते. मराठी भाषेतही विभिन्न अर्थछटा असलेले कितीतरी शब्द आहेत. जसे जीवन, तीर, मान, पाठ, वर, नाव, काळ अशी मोठी यादी देता येईल. जी गोष्ट शब्दांना लागू तीच वाक्याला, लेखाला, कवितेला ही लागू होते. त्यामुळेच एकच साहित्यकृती निरनिराळ्या वाचकांना निरनिराळी भासू शकते. त्यांना निरनिराळा अर्थबोध होऊ शकतो. जो जशी व्याख्या करेल, अर्थ काढेल त्याप्रमाणे तो बदलतो. मराठी काव्याचा प्रांत तर या वैशिष्ट्यानं समृद्ध आहे. मराठीत अशी कितीतरी गाणी, कविता, रचना आहेत की त्यांचा वरवरचा अर्थ एक, तर सखोल अर्थ अगदीच निराळा असतो. काहीवेळा वरकरणी शृंगारिक, लौकिक वाटणाऱ्या एखाद्या कवितेच्या गर्भात गहन, गूढ, रहस्यमयी, अलौकिक अर्थ जोपासलेला असू शकतो किंवा जुळ्या भावंडांप्रमाणे दोन्ही अर्थ अगदी सुखनैव नांदू शकतात. अनेकदा तर पुनःपुन्हा ऐकताना दरवेळी अर्थाचा नवा पदर उलगडून येतो.  सकृतदर्शनी प्रियकर–प्रेयसी, विरह भावना, मीलनाची ओढ अशा शृंगार प्रांतात घेऊन जाणारी सुरेश भ...

स्मृतीबनातून –रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी

इमेज
‘ रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी’ उन्हाळ्याचे दिवस. दिवसभर सूड उगवावातशी आग ओकणारा सूर्य आता थोडा वरमाला होता आणि काहीसा मवाळ झाला होता. मावळतीचं त्याचं हे आरक्त रूपबिंब फारच विलोभनीय दिसत होतं. ते कॅमेरात कैद करण्याचा मोह आवरला नाही. आकाशी जणू झुंबर लावल्या प्रमाणे तो लोहगोल दिसत होता. दिवे लागणीची ही वेळ. भास्कराच्या मावळण्यानी पसरत जाणाऱ्या अंधारात रस्त्याच्या दोन्ही बाजूला दूर पर्यंत दिसत असलेल्या वस्त्यांमध्ये लागलेले दिवे, परिसर प्रकाशमान करत होतं.  दिठीनं हे सारं पाहत असताना अवचित, अगदी सहजपणे एक आशयपूर्ण कविता मनात दाटून आली.  ‘दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले....’ गेले कित्येक दिवस  ही कविता मनात घर करून राहिली होती. केवळ मुखड्यावरून हे आनंदाचं, दिवाळीचं वर्णन वाटून जातं. पण जसजसे आपण पुढचे अंतरे ऐकत जातो तसतशी ही कविता अगदी आपलं बोट धरून आपणाला काहीशा गूढ  अंतर्ज्ञानाच्या प्रांतात हळुवार घेऊन जाते.  आपण चुकीच्या वाटेनं निघालो होतो हे कळून येतं. आणि मग योग्य वाट शोधून गंतव्य स्थळी पोहोचण्याची ओढ उत्पन्न होते. गोव्याचे प्रतिभावंत कवी शं...

स्मृतीबनातून – एकांत(पद्य)

इमेज
  एकांत आज फिरून आठवांचे, दाटून अभ्र आले  सरोवर डोळ्यांचे, अश्रूंनी तुडुंब भरले या कातर संध्याकाळी, सोबतीस नाही कोणी  शेवही तिचा नव्हता, थोपविण्यास ते पाणी एकांत निशेचा सारा, तो असह्य जीवघेणा आस उषेची होती, परी सरता रात सरेना रोखला हुंदका कंठी, ओठी ठेवले स्मितास उमजून जगरीती ही, मी जपले एकांतास  नितीन सप्रे 220520261600

स्मृतीबनातून – लेखनप्रिया/अक्षरा (पद्य)

इमेज
लेखन–प्रिया/अक्षरा काही लिहू लागलो की होती तुझेच भास काना मात्रा मधून तनुचे तुझ्या आभास निर्लेप चेहरा तुझा, कोवळा ही असा की तळ्यातली भूर्जपत्र, मज दिलीत लेखनासी बिंब भाळीचे, विलसणारे उठावदार सांगू परी काय, मज भासते अनुस्वार गौर गाली लांबलेली, बट काळी सुरेख गमते मला जणू, अक्षरा वरील रेख रेखीव डोळ्यांवर, भुवयांच्या त्या कोलांट्या दिसती मला सदा त्या, शब्दांतील वेलांट्या कुसुमी ओष्ठांवर, वसले नित्य सुहास्य उलगडे अलवार, ओळींतील  रहस्य आखीव करकमले, दोन्ही अती सुरेख  उभी ठाकली जणू ती काना मात्रेचे रुप  वाचतो जेव्हा स्वये, ही माझीच लेखनकृती वाटे सदा मला, असे तुझीच देहाकृती नितीन सप्रे 160520261300

स्मृतीबनातून - आशेचा स्वर (पद्य)

इमेज
आशेचा स्वर स्वरावली ही उदास झाली सोडुनी रसिका आशा गेली सूर तुझ्या कंठातून येता अंगावरती धुंद शहारा फिरत आगळी गळ्यात सुंदर गीतास लाभते रूप मनोहर भाव नाट्य चित्र गीत गझल साऱ्याच विधा तुझ्या तरल  तृप्त केलेस लौकिक जीवा रिझव आता अलौकिक देवा नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  1204261830

स्मृतीबनातून –मुक्त झंकार (पद्य)

इमेज
मुक्त झंकार  आता मनास काही उर लीच खंत नाही फेसाळ होता समुद्र गेला सुकून तोही गर्दीत माणसांच्या शोधित राहिलो साव सारे बेरके हे खेळले आपापला डाव वाचाळ शहाण्यांनी सगळा अनर्थ केला  अन अर्थ जीवनाचा मौनात दडून गेला धावलो उगाच होतो मागे मृगजळाच्या  उमजले उशिरा तो मार्ग नव्हे सुखाचा बरसल्या मेघा परी मानस रिक्त होता हृदयी झंकार झाला निर्गुण ईश्वराचा विरले आभास हे सत् जागले मनात घुमला स्वर पावरीचा दूर तो वनात  नितीन सप्रे 120320262140